Dhor Samaj App is Live

Now Dhor Samaj App is available on google playstore. Download the app to join the community.

Join Dhor Samaj Community

आज आपला समाज साधारण १० लाखापर्यंत आहे. त्यात राजकारणी आणि अधिकाऱ्यांपासून ते गरीब मजुरापर्यंत सर्वच लोक आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत केली तर सगळे प्रश्न सुटू शकतात. हीच यामागची संकल्पना आहे.

 

पुढील काही वर्ष खालील उद्देशांसाठी आपण एकत्र येणार आहोत.

 • ३५ वयोगटाखालील प्रत्येक व्यक्ती किमान पदवीधर झाली पाहिजे. 

 • प्रत्येक पदवीधर व्यक्तीला त्याच्या निवडीनुसार नोकरी मिळाली पाहिजे.

 • प्रत्येक घरामध्ये एकतरी पदवीधर असला पाहिजे. 

 • प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणाच्या खर्चाची सोय झाली पाहिजे. 

 • प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे एकतरी घर झाले पाहिजे.

 • प्रत्येक घराचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी ५ लाख झाले पाहिजे. 

 पुढच्या १५ वर्ष्यात किमान आपल्या समाजातून

 • २५००० सरकारी उच्च अधिकारी झाले पाहिजेत.
 • ५००० उद्योजक झाले पाहिजे ( १० कोटी पेक्षा जास्त भांडवल असणारे ).
 • २०००० विद्यार्थी बाहेर देशात किंवा भारतातल्या उच्च संस्थांमधून शिक्षित झाले पाहिजे.
 • प्रत्येक जिल्ह्याला एकतरी समाजाचे हॉस्टेल, शिक्षण संस्था, बँक, वृत्तपत्र, हॉटेल, मेडिकल, उद्योग आणि हॉस्पिटल झाले पाहिजे.

 तुमच्याकडून काय अपेक्षित आहे :

 • किमान आठवड्याला १ तास समाजासाठी द्यायला हवा. 

 • जास्तीत जास्त आपल्याच समाजाच्या व्यक्ती कडून वस्तूंची खरेदी करावी. 

 • आपल्या समाजातील उद्योग करणाऱ्या लोकांना संधी उपलब्ध करून द्याव्या. 

 • आपल्या समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन करावे. 

 • आपल्या समाजातील तरुणांना रोजगारासाठी मदत करावी. 

 • समाजातील सर्वच घटकांना सरकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे.

 

तुमच्या आयडिया सुचविण्यासाठी +91-9975721991 / +९१-९९७५७२१९९१ वर व्हाट्सएप मैसेज पाठवा.